Posts

18 ।। दशसुन्दरीचरितम् ।। (दौंड ते दिल्ली व्हाया अलिबाग , मुंबई )

                          ।।  द श सु न्द री च रि त म्  ।। दौंड  ते   दिल्ली    व्हाया  अलिबाग , मुंबई  बदलीचं रहाटगाडगं फिरत राहिलं आणि त्याला बांधलेल्या घड्यांसारखे आम्हीही . दौंडला भेटलेली अपूर्व पूर्वा , तर अलिबागला ढगांच्या हिंदोळयांवर बसून येणारी, तर कधी सरसरसर समुद्राच्या लाटांवरून धडकणारी, तर कधी  फुलपाखराच्या पंखांसारखी भेटलेली मुलायम पश्चिमा, गतस्मृतींच्या पेटीत जपून ठेवली आहे . अनेक तपांनंतरही त्यांचे रंग मला तेवढेच बहारदार वाटतात . लहानपणी दर गुढीपाडव्याला घरी येणारा दौणा ( सुवासीक वासाची वनस्पती . रामाला दौणा प्रिय आहे म्हणून गुढी पाडवा ते हनुमान जयती हा दौणा फुलवाल्यांकडे उपलब्ध असे .) आम्ही आमच्या कपड्याच्या कप्यात ठेऊन देत असू . दरवेळेला कपाट उघडलं की दौण्याचा मंद सुवास आतून बाहेर येई . तसा ह्या सुंदर आठवणींचा सहवास मनाला कायम प्रसन्न करत असतांनाच,------------!!! समुद्रकिनार्‍याच्या प्रशस्त फुटबॉल ग्राऊंडच्या डी मधूनच किक मारून चेंडू थेट गोलमधे अच...