Posts

Showing posts from October, 2025

रुक्मणी स्वयंवराची लढाई

  रुक्मणी स्वयंवराची लढाई असं म्हणतात, मुलगी नवरामुलगा smart, handsome आहे की नाही हे बघते. मुलाचं रूप, व्यक्तिमत्व impressive आहे की नाही बघते. मुलीची आई मुलाकडे घरदार, जमिनजुमला, पैसा आहे की नाही बघते. मुलीचे वडील मुलाचं शिक्षण योग्य आहे नं बघतात. मुलीचे नातेवाईक मुलाचं कुळं आपल्या कुळाला साजेसं आहे का नाही बघतात. लग्नाला आलेले बाकी उपस्थित निमंत्रित मात्र जेवण सुग्रास आहे का नाही एवढाच मर्यादित विचार करतात.   कन्या वरयते रूपं । माता वित्तं पिता श्रुतम् । बान्धवाः कुलमिच्छन्ति । भोजनम् इतरेजनाः ।।   ‘हुरळली मेंढी लांडग्या मागे’ म्हणी प्रमाणे वयात आलेल्या अनेक लग्नाळु मुली वरवर स्तुती करणार्‍या, गोड बोलणार्‍या, पण प्रत्यक्षात त्यांना फसवून गळाला लावणार्‍या मुलांना भुलतात. स्टंटबाजी करत वाट्टेल तशी मोटरसायकल चालवून इंप्रेस करणार्‍या, भपकेबाज कपडे घालून उगीच strutting करत अशी तशी   केशरचना सांभाळत सिनेमा हिरोप्रमाणे वागणार्‍या, वाट्टेल तशा गाड्या आणि पैसे उडवणार्‍या छपरी हिरोंच्या प्रेमात पडतात आणि अलगद कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीप्रमाणे त्यांच्याकडून फस...