17 ।। दशसुन्दरीचरितम् ।। (अलिबागचा किल्ला )
।। द श सु न्द री च रि त म् ।। 17 अलिबागचा किल्ला – समुद्रकिनारी असलेले बंगले आणि अलिबागचा किंवा कुलाब्याचा किल्ला , खांदेरी उंदेरी हे समोरासमोर आहेत . बंगले जमिनीशी जवळीक साधून आहेत तर किल्ले समुद्राशी . खांदेरी उंदेरी सहज चालत जाऊन यावे असे नाहीत . ते चांगले खोल समुद्रात बेटांवरती आरूढ आहेत . कुलाब्याचा किल्ला मात्र फारच फसवा . ओहोटी सुरू झाली की तो भुईकोट किल्ला होतो . आणि भरती सुरू झाली की जमिनीशी नातं तोडून जलदुर्ग होतो . समुद्रकिनारी राहणार्यांना तिथीवालं पंचांग माहित असणं जरुरीचं असतं. जी तिथी असेल तिच्या पावणं केलं की साधारण भरतीच वेळ कळते. आज प्रतिपदा असेल तर भरती पहाटे पाऊण वाजता आणि दुपारी पाऊण वाजता. तर पौर्णिमेला साडे अकरा बारा ही सकाळ आणि रात्रीची वेळ असे. ह्या वेळेला पूर्ण भरती असे किल्ल्यापर्यंत पसरलेली रेशमी पिवळसर वाळू , त्याच्यावर लाटांच्या उमटलेल्या नागमोड...